उत्तर जायकवाडी वसाहतीवरील अतिक्रमण मोहीम थांबवण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) पाटबंधारे विभागामार्फत उत्तर व दक्षिण जायकवाडी येथील वसाहतीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे यामुळे या वसमतीमध्ये राहणाऱ्या नागरिकात मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली असून अतिक्रम मोहीम तीन महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या बंदोबस्तात दक्षिण जायकवाडी, उत्तर जायकवाडी येथील वसाहतीवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येथे राहणारे नागरिकावर बेघर होण्याची वेळ आली असून मुलांच्या परीक्षा होईपर्यंत अतिक्रमण मोहीम पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे परंतु पाटबंधारे विभागाने नागरिकांच्या मागणी संदर्भात कोणतीही सकारात्मक भूमिका न घेता अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे.

याच्या निषेधार्थ या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आज सकाळी पैठण संभाजीनगर रोडवर राहुल नगर येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे पैठण संभाजीनगर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे